
सोलापूर : "एसईबीसी' आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने नियुक्तीच्या प्रतीक्षेतील दोन हजार 125 उमेदवारांना "ईडब्ल्यूएस'मधून नियुक्ती दिली जाणार आहे. मात्र, ज्यांचे उत्पन्न आठ लाखांहून अधिक आहे, त्यांचा खुल्या प्रवर्गात समावेश करून त्यांच्यासाठी पुन्हा नव्याने मेरीट यादी लावली जाणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला असून, त्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी राज्य सरकारने 13 टक्के आरक्षण दिले. मात्र, त्यास सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती मिळाल्याने परीक्षेच्या सर्व पायऱ्या यशस्वीपणे पार करूनही विविध विभागांमधील उमेदवारांची नियुक्ती रखडली. यासंबंधीची माहिती राज्य सरकारने संकलित केली असून त्यात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातील 420 पदांचा समावेश आहे. आता पुन्हा एकदा आयोगाकडून माहिती मागविली असून त्यात कोणत्या वर्षातील, कोणत्या प्रवर्गातील उमेदवार आहेत, अशा बाबींचाही समावेश आहे.
फेब्रुवारी 2019 नंतर जाहिरात निघाली आणि संबंधित पदांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबद्दल आता नवा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवला गेला आहे, असेही वरिष्ठ अधिकारी म्हणाले. दुसरीकडे आता गृह, सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय विभागाच्या वतीने नव्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यात "ईडब्ल्यूएस'मधून आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मराठा समाजातील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे, असेही सांगण्यात आले.
"ईडब्ल्यूएस'चा चांगला घेतला निर्णय
"एसईबीसी' आरक्षणाला स्थगिती असल्याने राज्य सरकारने त्या उमेदवारांसाठी "ईडब्ल्यूएस'चा चांगला निर्णय घेतला. आता नियुक्तीच्या प्रतीक्षेतील विविध विभागांमधील दोन हजार 125 उमेदवारांचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला असून, त्यावर लवकरच निर्णय होईल.
- डी. एस. करपते,
उपसचिव, सामान्य प्रशासन
ठळक बाबी...
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.