Vidhan Sabha 2019 : अवघ्या 30 दिवसांत 5 वर्षांच्या कामाचा निकाल

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 September 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 चा कार्यक्रम : 
अर्ज भरण्याची तारीख : 27 सप्टेंबर 
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 4 ऑक्टोबर
अर्ज छाननी : 5 ऑक्टोबर
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 7 ऑक्टोबर
मतदानाची तारीख : 21 ऑक्टोबर
निकाल : 24 ऑक्टोबर

पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून, आजपासून (21 सप्टेंबर) बरोबर महिनाभराने 21 ऑक्टोबरला मतदान होत आहे. त्यामुळे उमेदवारांकडे फक्त महिनाभराचा कालावधी आहे. पण, अद्याप एकाही पक्षाचा उमेदवार जाहीर झालेला नाही.

गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्व प्रमुख पक्ष स्वतंत्र लढले होते. मात्र, यंदा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत, तर भाजप-शिवसेना युतीत लढण्याची चिन्हे आहेत. पण युती आणि आघाडीबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. चारही प्रमुख पक्षांतील उमेदवार निश्चित नाहीतच, पण युती, आघीडी होणार हेही अंतिम नाही. त्यामुळे आजपासून अवघ्या महिनाभराच्या कालावधीत उमेदवारी निश्चित होण्याबरोबरच प्रचार, खर्च, कार्यकर्ते या सर्वांचे नियोजन करावे लागणार आहे.

विधानसभेसाठी आज मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या. महाराष्ट्र आणि हरियानात 21 ऑक्टोबरला मतदान होत आहे. तर, 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. भाजप आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाल्याने या दोन्ही पक्षांना उमेदवारी देताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. निष्ठावान कार्यकर्ते व नेत्यांसह आयारामांनाही दुखावता येणार नाही. त्यामुळे उमेदवार नक्की कोण असेल, हेही पाहणे उत्सुकतेचे असेल. तर, दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते सोडून गेल्याने युवा उमेदवारांना संधी मिळणार हे स्पष्ट आहे. पण, आता कोणताही उमेदवार असला तरी त्याच्याकडे फक्त महिनाभराचा वेळ आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 चा कार्यक्रम : 
अर्ज भरण्याची तारीख : 27 सप्टेंबर 
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 4 ऑक्टोबर
अर्ज छाननी : 5 ऑक्टोबर
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 7 ऑक्टोबर
मतदानाची तारीख : 21 ऑक्टोबर
निकाल : 24 ऑक्टोबर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Candidates have only 1 months for campaign in maharashtra Vindha sabha Elections