वयोमर्यादा संपलेल्यांची निराशा! राज्यसेवेसाठी अर्जाची संधी हुकली

वयोमर्यादा संपलेल्यांची निराशा! राज्यसेवेसाठी अर्ज करण्याची संधी हुकली
MPSC
MPSCSakal
Summary

कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मागच्या वर्षी खूपच लांबणीवर पडल्या.

सोलापूर : कोरोनामुळे (Covid-19) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission -MPSC) परीक्षा (Exams) मागच्या वर्षी खूपच लांबणीवर पडल्या. अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात आल्याने त्यांना स्पर्धा परीक्षेच्या (Competitive exams) स्पर्धेतून बाद व्हावे लागले. त्या उमेदवारांचा सकारात्मक विचार करून राज्य सरकारने (Maharashtra State Government) त्यांना एक वाढीव संधी देण्याचा निर्णय घेतला. 10 नोव्हेंबरला निर्णय झाला, परंतु शासन निर्णयास विलंब लागला. दरम्यान, विधानपरिषदेची आचारसंहिता संपल्यानंतर त्या उमेदवारांना राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी (State Service Pre-Examination) अर्ज करण्याची संधी देण्याचा प्रयत्न होईल, असे सरकारमधील एका राज्यमंत्र्याने स्पष्ट केले होते. परंतु, तसे काहीच न झाल्याने आता 2 जानेवारीला होणाऱ्या पूर्वपरीक्षेपासून ते उमेदवार दूर राहणार आहेत. (Candidates who have reached the age limit have lost the opportunity to apply for state service)

MPSC
पदवीधरांसाठी मेट्रोमध्ये बंपर नोकऱ्या! जाणून घ्या सविस्तर

'एमपीएससी'अंतर्गत सर्वात मोठ्या पदांची भरती राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या माध्यमातून केली जाते. त्यानंतर संयुक्‍त पूर्वपरीक्षेतून पदे भरली जातात. वयोमर्यादा वाढीचा निर्णय होऊनही जानेवारी 2022 मध्ये होणाऱ्या राज्य सेवा पूर्वपरीक्षेचा अर्ज त्या उमेदवारांना करता आलेला नाही. त्यामुळे आता त्यांना संयुक्‍त पूर्व परीक्षेचा, पीएसआय (PSI) व लिपिक (Clerk) पदासाठीच अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, ओमिक्रॉनचे (Omicron) संकट डोके वर काढू लागले असून तिसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविली जात आहे. राज्य सरकारने काही प्रमाणात निर्बंधही लागू केले आहेत. उमेदवारांना पुढच्या वर्षी जून 2022 मध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षेची जाहिरात निघेल, अशी आशा आहे. मात्र, कोरोना पुन्हा वाढणार नाही, यादृष्टीने राज्य सरकारने खबरदारी घेतली आहे. तरीही, तिसऱ्या लाटेमुळे पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षा लांबणीवर पडल्यास वयोमर्यादा वाढीची संधी दिलेल्यांना पुन्हा संधी मिळणार का, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. तो निर्णय कोरोना संसर्गाच्या वाढीवर अवलंबून आहे, परंतु राज्य सरकारने त्यावेळी सकारात्मक विचार करावा, अशी मागणी स्टुडंट राईट्‌स संघटनेने (Student Rights Association) केली आहे.

MPSC
2022 मध्ये पैसा कमावण्याची बंपर संधी! येणार 60 हजार कोटींचा IPO

ठळक बाबी...

  • कोरोनामुळे MPSC च्या परीक्षा न झाल्याने उमेदवारांना एक वाढीव संधी देण्याचा 10 नोव्हेंबर रोजी झाला निर्णय

  • 11 मार्च 2020 ते 17 डिसेंबर 2021 पर्यंत वयोमर्यादा संपलेल्यांना डिसेंबर 2022 पर्यंत करता येईल परीक्षेचा अर्ज

  • विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शासन निर्णयास विलंब; जानेवारीतील राज्यसेवा पूर्वपरीक्षेची संधी हुकली

  • वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांना अर्जासाठी मुदतवाढीचे दिले होते राज्यमंत्र्यांनी आश्‍वासन; परंतु तसे काहीच झाले नाही

  • संयुक्‍त पूर्वपरीक्षा, पीएसआय, लिपिक पदासाठी करता येईल आता वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांना अर्ज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com