फुलंब्री - फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या चौका शिवारात गणेश जाधव यांनी शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून २२ मे रोजी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सोमवारी (ता. नऊ) सायंकाळी सहा वाजता पाच जणांविरुद्ध फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.