CBI ला महाराष्ट्रात तपासाची परवानगी नाही; शिंदे सरकारचा मोठा निर्णय |cbi not allowed to investigate in maharashtra eknath shinde govts decision | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath shinde

CBI ला महाराष्ट्रात तपासाची परवानगी नाही; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

सीबीआयला शिंदे सरकारच्या काळातही राज्याची परवानगी घेऊन तपास करावा लागणार आहे. एकनाथ शिंदे सरकारने केंद्रीय अन्वेषण विभागाला महाराष्ट्रातील प्रकरणांचा तपास करण्यासाठी अद्याप संमती दिलेली नाही. महाविकासआघाडी सरकार सत्तेवर असताना ठाकरेंनी सीबीआयबद्दल घेतलेला निर्णय कायम ठेवला आहे.(cbi not allowed to investigate in maharashtra eknath shinde govts decision )

हेही वाचा: Eknath Shinde : माध्यमांना गुंगारा देत मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर?

अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी झालेल्या महाराष्ट्र पोलीस आणि सीबीआय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला होता. केंद्र सरकार आपल्या यंत्रणांचा दुरूपयोग करत असल्याचा ठपका ठेवत हा निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यानच्या काळात, महाराष्ट्र पोलीस आणि सीबीआय असा संघर्षही निर्माण झाला होता. तर महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास असल्याचे म्हणत महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतला होता. मात्र, आता सत्तांतर झाल्यानंतर या निर्णयात बदल होईल अशी अपेक्षा होती. मात्र, शिंदे सरकारनेही हा नियम कायम ठेवला आहे.

हेही वाचा: Ramdas Athawale : शिंदे गटानं आरपीआयमध्ये विलीन व्हावं; रामदास आठवलेंची मोठी ऑफर

पंजाब, झारखंड, पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, मिझोरम, केरळ व मेघालय या राज्यांतही सीबीआयला सर्वसाधारण संमती दिली गेलेली नाही.

Web Title: Cbi Not Allowed To Investigate In Maharashtra Eknath Shinde Govts Decision

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CBIEknath Shinde