चर्मोद्योग विकासासाठी 100 कोटींच्या उद्योग समूहास केंद्रांची मान्यता - डॉ. सुरेश खाडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

चर्मोद्योग विकासाला चालना व गती मिळावी यासाठी केंद्र सरकारने 100 कोटींच्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे, ही माहिती सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली. केंद्र सरकारच्या मेगा लेदर फुटवेअर एन्ड एक्सेसरीज क्लस्टर या योजनेअंतर्गत राज्यात रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 50 एकर क्षेत्रावर लेदर क्लस्टर प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे.

मुंबई : चर्मोद्योग विकासाला चालना व गती मिळावी यासाठी केंद्र सरकारने 100 कोटींच्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे, ही माहिती सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली. केंद्र सरकारच्या मेगा लेदर फुटवेअर एन्ड एक्सेसरीज क्लस्टर या योजनेअंतर्गत राज्यात रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 50 एकर क्षेत्रावर लेदर क्लस्टर प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या मेगा लेदर फुटवेअर एन्ड एक्सेसरीज क्लस्टर या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत राज्यांमध्ये क्लस्टर प्रकल्पाची स्थापना करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

सदरचा प्रस्ताव सुमारे 100 कोटी रुपयांचा असून यात चामडे पादत्राण व संबंधित वस्तूंच्या उत्पादनासाठी अत्याधुनिक तंत्राची सुविधा उभारण्यात येणार आहे. पादत्राणाची देशामध्ये वाढीव मागणी असली तरी पादत्राण आयातीमधूनच मागणीची पूर्तता होते व त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेचे बरेच नुकसान झाले आहे. यावर आळा घालण्यासाठी व चर्मोद्योगास नव्याने चालना देण्यासाठी तसेच चर्मकार समाजाच्या विकासासाठी हा प्रकल्प अतिशय मोलाचा ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Centers are approved 100 cr rs for Group of Industry of leather says Suresh Khade