esakal | सँकीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास पाटील यांचं निधन

बोलून बातमी शोधा

Suhas Patil
सँकीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास पाटील यांचं निधन
sakal_logo
By
ई सकाळ टीम

मुंबईः सँकीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास पाटील यांचं निधन झालं आहे. २०१५ साली सँकी सोल्यूशनची खरी सुरुवात झाली. सुहास पाटील यांच्या निधनाचा सर्वांनाच धक्का बसला आहे. २०१५ पासून आतापर्यंत म्हणजेच ५ वर्षात सँकी सोल्यूशननं अनेक टप्पे पार पाडले. सुहास पाटील यांनी ५ वर्षातच सँकीला एका उंच शिखरावर नेलं.

यूके सरकारनं २०१८ ला सुहास यांची Global Entrepreneur Program साठी निवड केली होती. त्यांना त्यासाठी पुरस्कारही जाहीर करण्यात आला होता. महत्त्वाचं म्हणजे २०२०ला झालेल्या फोर्ब्स तंत्रज्ञान परिषदेत (FORBES Technology Council)ही त्यांचा सहभाग होता.

सुहास पाटील यांना आतापर्यंत मिळालेले पुरस्कार

Maha Entrepreneurship Summit 2019

Top 50 Tech Visionary Awards in 2019

Top 7th Fastest Growing Organization (संपूर्ण देशात)

Top 51st Fastest Growing Companies (एपीएसी प्रदेश डिलॉइट द्वारे)

सुहास यांच्या पश्चात त्यांची पत्नी शोभा पाटील, त्यांचा मुलगा पूरव पाटील आहेत. त्यांच्या जाण्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे.