‘सोमय्यांना कोल्‍हापुरी हिसका दाखवू’; राष्ट्रवादीचे आव्हान

Kirit-Somaiya
Kirit-Somaiyasakal media
Updated on

कागल (कोल्हापूर) : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप म्हणजे निव्वळ स्टंट आहे. हिंमत असेल तर सोमय्या यांनी जनतेच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत, असे आव्हान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांच्या पत्रकार परिषदेमध्ये दिले. सोमय्या सोमवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याचे समजते. त्या पार्श्वभूमीवर आम्ही जनता, कार्यकर्ते, सरसेनापती साखर कारखान्याचे सभासद शेतकरी, हजारो निराधार माता-भगिनी आणि रुग्ण कागलमध्ये जमत आहोत. आम्हाला भेटूनच त्यांनी पुढे जावे, असेही आव्हान दिले.

जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने म्हणाले, ‘‘सोमय्या यांनी जे प्रश्न उपस्थित केलेत त्यांची माहिती सविस्तर देऊ, असे निवेदन मंत्री मुश्रीफ यांनी केले होते. असे असतानाही कोल्हापूर दौरा, कागल आणि कारखाना ही स्टंटबाजी कशासाठी? सोमवारी सकाळी दहा वाजता कागलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तीस हजारांवर जनता जमणार आहे. आमच्या प्रश्नांची उत्तरे देऊनच सोमय्यांनी पुढे जावे. कारखान्याचे ४० हजार सभासद शेतकऱ्यांची ते साखर बंद करू पाहत आहेत. हे कशाचे द्योतक आहे?’’

Kirit-Somaiya
कोल्हापूर: मानाच्या तुकाराम माळी मंडळाच्या गणपतीचे विसर्जन; पाहा PHOTO

‘बिद्री’चे संचालक प्रवीणसिंह भोसले म्हणाले, ‘‘प्रतिकूल परिस्थितीतून सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची उभारणी झाली आहे. ४० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी सोने तारण ठेवून सभासदत्व घेतले. बिनबुडाचे व सनसनाटी आरोप, वक्तव्ये करून स्टंटबाजी करायची, हा सोमय्या यांचा छंदच आहे. कदाचित, सोमय्यांचा हा शेवटचा स्टंट ठरेल.’’

जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील म्हणाले, ‘‘कारखाना उभारताना काय यातना झाल्या, हे आम्हाला माहीत आहे. कागल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भावनांचे आणि कष्टाचे हे श्रममंदिर आहे. शेतकऱ्यांचा सन्मान करणारा आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबवणारा हा कारखाना आहे. श्रममंदिरावर केलेली चिखलफेक खपवून घेणार नाही.’’

माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर म्हणाले, ‘‘योद्धा हरत नाही तेव्हा त्याला बदनाम करण्याचे षङ्यंत्र रचले जाते. मंत्री मुश्रीफ यांच्यावर रचलेले हे षङ्यंत्र मोडून काढूया आणि जनतेची ताकद दाखवूया.’’

बाचणीचे माजी सरपंच सूर्यकांत पाटील म्हणाले, ‘‘सोमय्या हे भाजपचे नेते नसून पक्षसंघटनेवर वाढलेले बांडगूळ आहे.’’

उपनगराध्यक्ष विवेक लोटे, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, नगरसेवक चंद्रकांत गवळी, जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, प्रवीण काळबर, माजी नगराध्यक्ष नवल बोते, शशिकांत खोत, शिवानंद माळी, बच्चन कांबळे, रणजित बन्ने, आनंदा पसारे, बाबासो नाईक, सागर गुरव, संग्राम गुरव, देवानंद पाटील, सतीश घाडगे, पंकज खलिफ आदी प्रमुख उपस्थित होते. तालुकाध्यक्ष विकास पाटील यांनी स्वागत केले. सभापती रमेश तोडकर यांनी आभार मानले.

‘सोमय्या यांना कोल्‍हापुरी हिसका दाखवू’

कोल्‍हापूर : भाजप नेते किरीट सोमय्‍या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर खोटे आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्‍न केल्याने कार्यकर्ते संतप्‍त आहेत. यातच सोमय्‍या यांनी सोमवारी (ता. २०) घोरपडे कारखान्यासह कागल मतदारसंघात काही ठिकाणीही भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्‍ह्यात संतापाची लाट असताना दौरा आखून त्यांनी कोल्‍हापूरकरांना आव्‍हान दिले आहे. त्यामुळे त्यांना कितीही सुरक्षा दिली तरी कोल्‍हापुरी हिसका दाखवू, असे जाहीर आव्‍हान राष्‍ट्रवादीचे जिल्‍हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, आदिल फरास, राजू लाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिले. पत्रकार परिषदेस अनिल साळोखे, महेंद्र चव्‍हाण, मधुकर जांभळे व कार्यकर्ते उपस्‍थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com