Champasing Thapa : बाळासाहेबांची सावली अशी ओळख असणारा चंपासिंह थापा देखील शिंदे गटात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

champasing thapa close aid to Balasaheb Thackeray jion cm eknath Shinde group shivsena

बाळासाहेबांची सावली अशी ओळख असणारा चंपासिंह थापा देखील शिंदे गटात

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडनंतर शिवसेनेला महाराष्ट्रात मोठं खिंडार पडलं, शिवसेनेचे अनेक आमदार तसेच शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी देखील शिंदे गटाची वाट धरली. दरम्यान आता शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सावली अशी ओळख असलेले त्यांचे सहायक चंपासिंह थापा हे देखील एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चंपासिंह थापा यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहायक म्हणून त्यांची ओळख होती. (champasing thapa close aid to Balasaheb Thackeray jion eknath Shinde group)

आज ठाणे येथे चंपासिंह थापा यांने शिंदे गटात प्रवेश केला आहे. चंपासिंह थापा हे कित्येक वर्षांपासून बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू म्हणून काम करत होते. नेमका कोण आहेत हा चंपासिंह थापा जाणून घ्या

कोण आहे चंपासिंह थापा?

काही वर्षांपूर्वी नेपाळमधून भारतात आलेले चंपासिंह थापा हा गोरेगावात लहान-मोठी कामे करत असे. भांडूपचे नगरसेवक के.टी. थापा यांच्या ओळखीने चंपासिंग थापा यांना मातोश्रीवर प्रवेश मिळाला. नंतर त्याने स्वतःचं आयुष्य बाळासाहेब ठाकरे यांनाअर्पण करून टाकले. बाळासाहेब ठाकरे यांचा दिनक्रम सांभाळणे आणि त्यांची सेवा करणे ही कामे थापा करत. बाळासाहेबांच्या जेवणाची, औषधाच्या वेळांची आणि दिनक्रमातील प्रत्येक बारीकसारीक गोष्टींची तो काळजी घेत असे यातूनच थापा हा एक मातोश्रीतीचा भाग बनला. त्याने शिवसेनेत घडलेल्या प्रत्येक लहान मोठ्या घडामोडीचा थापा हा साक्षीदार राहिलेला आहे.

हेही वाचा: पुणे : भिडे पुलाजवळ ३५ वर्षीय व्यक्तीचा खून, नदी पात्रात आढळला मृतदेह