पूर्व विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 July 2020

गोव्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भात बऱ्याच भागात, मराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज दिला आहे.पूर्व विदर्भातील नागपूर,गोंदिया,गडचिरोली,चंद्रपूर जिल्ह्यात विजांसह पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. 

पुणे - राज्यातील बहुतांश भागात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा उघडीप दिली. पूर्व विदर्भात येत्या सोमवारी (ता. 28) विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रातही हलक्‍या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

मुंबईसह कोकणात तुरळक अतिवृष्टी सोमवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद हवामान खात्यात झाली. पुढील चोविस तासांमध्ये कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भात बऱ्याच भागात, मराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज दिला आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात विजांसह पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हिमालयाच्या पायथ्याकडे गेलेला मॉन्सूनचा आस, पाकिस्तान आणि परिसरावर असलेली पश्‍चिमी चक्रावाताची स्थिती, त्यापासून कोकणापर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यात पावसाने उघडीप दिली. सोमवारी पाकिस्तानपासून कोकणापर्यंतचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. तर मॉन्सूनचा आस दोन दिवसांत दक्षिणेकडे येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राज्यात पाऊस पुन्हा सुरू होणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chance of rain with thunderstorm in East Vidarbha