
वाझेंच्या या याचिकेवरून न्यायालयाने काल त्याला फटकारले होते.
सचिन वाझेने चांदिवाल आयोगाविरोधात केलेली याचिका बिनशर्त मागे
सचिन वाझे (Sachin waze) यांना मी कधीही भेटलो नाही, त्यांना ओळखत नाही, त्यांचे नावही माहित नाही, असे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी चांदीवाल आयोगाला सांगितले होते. दरम्यान, मागील कित्येक दिवसांपासून यासंबंधित अनेक घडामोडी समोर आल्या आहेत. दरम्यान, आता यासंबंधित चांदिवाल आयोगा (Chandiwal Commission) विरोधात सचिन वाझेने केलेली याचिका बिनशर्त मागे घेतली आहे. वाझेंच्या या याचिकेवरून न्यायालयाने काल त्याला फटकारले होते.
हेही वाचा: "युक्रेनमध्ये भारताचा राष्ट्रध्वज पाकिस्तानी, तुर्कीश विद्यार्थ्यांच्या मदतीला"
या प्रकरणातील आयोगाला दिलेले चार अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाविरोधात वाझेनी उच्च न्यायालया याचिका दाखल केली होती. मात्र योग्य माहिती लपवत असल्या कारणानं खंडपीठानं वाझेच्या वकिलांना झापलं आहेत. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने यावर ताशेरे ओढले आहेत.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या लाचखोरीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चांदिवाल आयोगाची नियुक्ती केली आहे. दरम्यान, चांदिवाल आयोगासमोर सचिन वाझे याच्या वकिलाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची उलट तपासणी केली होती. यावेळी वाझे यांचे वकील अॅड. नायडू याने अनिल देशमुख यांना अनेक प्रश्न विचारले. यातील एका प्रश्नाला उत्तर देताना आपण सचिन वाझेला ओळखत नसल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले होते.
हेही वाचा: "मी वाझेंना कधीही भेटलो नाही" देशमुखांचा चांदिवाल आयोगासमोर जबाब
Web Title: Chandiwal Commission Sachin Waze Petition Against Unconditionally Withdrawn
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..