
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुन्हा एकदा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असं विधान केलं आहे.
या एका मुद्द्यावर राष्ट्रपती राजवट लागू शकते - चंद्रकांत पाटील
राज्याचे हिवाळी अधिवेशन (Assembly Winter Session) सुरु असून अध्यक्षपदाची निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याआधी नाना पटोले (Nana Patole) यांनी राजीनामा दिल्यानंतर अद्याप अध्यक्षाची निवड झालेली नाही. ती यावेळी आवाजी मतदानाने घेण्यासाठी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारच्या हालचाली सुरु आहेत. दरम्यान, यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुन्हा एकदा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असं विधान केलं आहे.
महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांकडे (Maharashtra Governer) अध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चेसाठी गेले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यपालांच्या अधिकारबद्दल मी बोलणं बरोबर होणार नाही. राज्यपालांना उलटसुलट बोलण्याचा अधिकार महाविकास आघाडीच्या नेत्यांना असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, आता तुम्ही नियमात बदल करून त्यांच्याकडे तारीख मागताय, दोन वेळा तुम्हाला तारीख दिली पण निवडणूक घेतली नाही. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेणं हा घटना राज्यपालांचा म्हणजे पर्यायाने घटनेचा अवमान असतो. या एका मुद्द्यावर सुद्धा राष्ट्रपती राजवट येऊ शकते असं त्यांनी म्हटलं.
हेही वाचा: गांधीजींविरोधात धार्मिक नेत्याचं आक्षेपार्ह विधान, राऊतांचा मोदींवर हल्लाबोल
चंद्रकांत पाटील यांनी याआधीही राज्यात राष्ट्रपती राजवटीबद्दल विधान केलं होतं. त्यामुळे बरीच चर्चाही झाली होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याआधी काही काळ राष्ट्रपती राजवट लागू होती.
Web Title: Chandrakant Patil Again Says President S Rule In Maharashtra
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..