Election
Election Esakal

महापालिका निवडणुका कधी होणार? भाजप नेत्याने दिली मोठी अपडेट

गेल्या काही दिवसांपासून महापालिका निवडणुका कधी होणार याची चर्चा सुरु आहे. काही महापालिकांमध्ये तर दोन वर्षांपासून प्रशासक आहेत. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सध्या प्रशासक भरोसे चालला आहे. अशातच भाजपच्या बड्या नेत्याने मोठी अपडेट दिली आहे. या निवडणुका कोणत्या महिन्यात होणार आहेत याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे. (Chandrakant patil big statement Sthanik Swarajya Sanstha Election maharashtra politics )

राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यांदाच या निवडणुकीवर भाष्य केलं आहे. एवढेच नव्हे तर या निवडणुका कोणत्या महिन्यात होऊ शकतात याची शक्यताही वर्तवली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यंदाच होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होणार असल्याचे सांगितले आहे.

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील? असा सवाल करण्यात आला. त्यावर आज त्याबाबत सुनावणी आहे. पण मला अजूनही वाटतं की या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होतील, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com