esakal | नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही अशी राज्यसरकारची अवस्था; चंद्रकांत पाटलांच टोला
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil

महाराष्ट्रात मराठा चळवळीचे नेतृत्व खासदार संभाजीराजे यांनी करावे,

'नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही अशी राज्यसरकारची अवस्था'

sakal_logo
By
युवराज पाटील

कोल्हापूर - 'नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही', अशी महाराष्ट्र सरकारची अवस्था आहे. महाराष्ट्रात मराठा चळवळीचे नेतृत्व खासदार संभाजीराजे यांनी करावे, अशी अपेक्षा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. कोल्हापुरात एका खासगी कार्यक्रमाच्या उपस्थितीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा: बैलांच्या नसबंदींवर प्रज्ञा सिंह ठाकूर संतप्त; लागलीच आदेश मागे

संभाजी राजे छत्रपती येत्या 25 ऑक्टोबरपासून मराठा आरक्षण प्रश्नासंबंधी महाराष्ट्र दौरा करणार आहेत. यासंबंधी विचारले असता ते म्हणाले, ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले तेव्हा ओबीसीच्या सर्व संघटना रस्त्यावर उतरल्या. ओबीसी आरक्षण अध्यादेश लागू करण्यासंबंधी संघटनानी आंदोलने केली. आज त्याच धर्तीवर संभाजीराजे पुन्हा बाहेर पडत आहेत. संभाजीराजे यांची भूमिका चांगली असून मराठा समाजाला त्याच निमित्ताने एक नवे नेतृत्व मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: 'अजित पवार हिम्मत असेल तर 'त्या'ची पक्षातून हकालपट्टी करा'

पूरग्रस्तांच्या मदती संदर्भात ते म्हणाले, राज्यसरकारने पूरग्रस्तांना मदतीचे आश्वासन देत तोंडाला पाने पुसली आहेत. भाजप सरकार असताना जी नुकसानभरपाई दिली होती, त्यातही महाविकास आघाडी सरकारने कपात केली आहे, यापेक्षा दुर्दैव दुसरे कोणते असेल असा टोला त्यांनी लगावला आहे.

loading image
go to top