Maharashtra Politics: शिवसेना फोडायची तयारी अडीच वर्षांपासून; चंद्रकांत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

Chandrakant Patil Statement Bjp Government Maharashtra Eknath Shinde Shiv Sena Uddhav Thackeray
Chandrakant Patil Statement Bjp Government Maharashtra Eknath Shinde Shiv Sena Uddhav Thackeray esakal

दोन-अडीच वर्षांपासून आपलं सरकार येईल असे सांगत होतो, हे सांगायला मी काही वेडा नव्हतो. त्यासाठी योजना बनवत होतो, असा गौप्यस्फोट पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. (Chandrakant Patil Statement Bjp Government Maharashtra Eknath Shinde Shiv Sena Uddhav Thackeray )

एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सत्तांतरावर भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातील 40 आमदार घेऊन भाजप पक्षासोबत सरकार स्थापन केलं. सध्या राज्यातील शिवसेना पक्षाचे दोन गट झाले असून उद्धव ठाकरे यांची साथ सोडून अनेक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटामध्ये दाखल होत आहेत. अशातचं चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्ष कधी फुटला यासंदर्भात खुलासा केला आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

दोन अडीच वर्षापासून आपलं सरकार येईल असे सांगत होतो. हे सांगायला मी काही वेडा नव्हतो. त्यासाठी योजना बनवत होतो, असे विधान पाटील यांनी यावेळी केलं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला कार्यकर्त्यांना विश्वास द्यायचा होता. ४० जणांना बाहेर काढणे सोपे नव्हते. त्यासाठी वेळ लागणार होता. त्यासोबत तशी संधी येणेही महत्त्वाचे होते. शेवटी ती वेळ साधल्या गेली आणि आपले सरकार आणले, असा खुलासा भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

तसेच, मला जेव्हा पक्षाने पुण्यात पाठवले तेव्हा अनेकांनी मला नाव ठेवली होती. पण तुम्ही अशा लोकांकडे लक्ष देऊ नका. मला पुण्यात पाठवताना दिल्लीत यासंदर्भात विचार करण्यात आला होता. शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाला मोठं धाडसं लागतं. त्यामुळे आम्ही त्यांना अंतर जाणवू देणार नाहीत, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

गेले अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारने आपण घेतलेल्या अनेक चांगल्या निर्णयांना स्थगिती दिली. आपण जे प्रकल्प सुरू केले, ते रद्द करण्याचे का त्यांच्या सरकाने केले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com