Chandrakant Patil: चंद्रकांत पाटलांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा; याचिका फेटाळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil

Chandrakant Patil: चंद्रकांत पाटलांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा; याचिका फेटाळली

मुंबई : भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. 2019 च्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याअगोदर मुंबई उच्चन्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयानेही चंद्रकांत पाटील यांना दिलासा दिला होता. त्यानंतर याचिकाकर्त्यांने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

(Chandrakant Patil Relief From Supreme Court)

हेही वाचा: Lampi: लम्पीचा धोका वाढला; मुंबई नियंत्रीत क्षेत्र घोषित

दरम्यान, 2019 च्या निवडणुकांच्या संदर्भात त्यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. पण उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालायने कायम ठेवला आहे. त्यामुळे पाटलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

2019 ची विधानसभा निवडणूक चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून लढवली होती. यावेळी त्यांनी संपत्ती आणि पत्त्यासंदर्भात माहिती लपवल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यामुळे यासंदर्भातील याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. पण या प्रकरणात चंद्रकांत पाटलांना हायकोर्टात आणि नंतर सुप्रीम कोर्टात दिलासा मिळाला आहे.