Video : बावनकुळेंकडून औरंगजेबचा आदरार्थी उल्लेख; नव्या वादाला फुटणार तोंड: Bavankule

राज्यात सध्या महापुरुषांसंबंधी विधानावरुन वाद सुरु असताना आता क्रूरकर्मा औरंगजेबावरुन वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.
Chandrasekhar Bavankule
Chandrasekhar Bavankulesakal

मुंबई : जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करत असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबचा उल्लेख औरंगजेबजजी असा केला. त्यामुळं आता पुन्हा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी बावनकुळेंचा हा व्हिडिओ शेअर केला आहे.

काय म्हणालेत बावनकुळे?

आव्हाड यांनी नुकत्याच औरंगजेबाबदद्ल केलेल्या विधानावर भाष्य करताना बावनकुळे म्हणाले, "हे जितेंद्र आव्हाड खोट्या प्रसिद्धीसाठी नौटंकी करत असतात. आव्हाड एक स्टंटबाज आणि नौटंकी माणूस आहे. त्यांच्या प्रत्येक विधानावरुन वाद निर्माण होतो आता औरंगजेबजी यांना ते क्रूर मानत नाहीत" बानवकुळे यांच्या या विधानामुळं वादाचा नवा खेळ सुरु झाला आहे.

मिटकरींकडून व्हिडिओ ट्विट अन् भाजपला सवाल?

बावनकुळे यांच्या विधानाचा व्हिडिओच आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट केला असून यावरुन त्यांनी अजित पवारांविरोधात आंदोलन करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना काही प्रश्न विचारले आहेत. मिटकरी म्हणतात, "क्रूरकर्मा औरंग्याला भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब ज्यावेळी औरंगजेबजी असे सन्मानाने म्हणतात, त्यावेळी धर्मवीर शब्दावर राजकारण करू पाहणारे औरंगजेबाचे बगलबच्चे बावनकुळे यांचा पुतळा जाळण्याची हिंमत दाखवतील का? विशेषता टिल्ल्या आमदार यांच्या पुतळ्याचा कडेलोट करेल का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com