Sharad Pawar : "भावी पंतप्रधान म्हणून मिरवलं अन्… "; भाजपकडून पवारांची चंद्रकांत पाटलांशी तुलना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ncp leader sharad pawar reaction on chandrakant patil

Sharad Pawar : "भावी पंतप्रधान म्हणून मिरवलं अन्… "; भाजपकडून पवारांची चंद्रकांत पाटलांशी तुलना

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्त्युत्तर दिलं. बावनकुळे यांनी यासंदर्भात दोन ट्विट केले आणि काही मिनीटांतच ते डिलीट देखील केले.

पुणे जिल्ह्यातील दादागिरी आणि मक्तेदारी संपवली असल्याचे विधान पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. याबद्दल विचारले असता शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीका केली होती. यानंतर चंद्रकांत बावनकुळेंनी शरद पवारांवर हल्लाबोल केला.

हेही वाचा: Rishabh Pant Post : जीव वाचवणाऱ्या 'त्या' दोघा हिरोंसाठी ऋषभ पंतची खास पोस्ट, म्हणाला…

त्यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये बावनकुळे म्हणाले की, "पक्षादेश म्हणून पुण्यात लढून जिंकणारे चंद्रकांत पाटील एकीकडे आणि पक्षाध्यक्ष असूनही माढ्यातून ऐन वेळी कच खाऊन पळ काढणारे शरद पवार दुसरीकडे. साडेतीन जिल्ह्याचा पक्ष सांभाळणाऱ्यांनी आधी शेपूट का घातली सांगावं, मग दादांबद्दल बोलावं. 'माढ्यात पाडा'ची भीती वाटून कोण पळालं?" असा सवाल त्यांनी केला.

तर दुसऱ्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले की, "भावी पंतप्रधान म्हणून मिरवलं, पक्ष बदलले तरी कधी स्वबळावर स्वपक्षाचा मुख्यमंत्री राज्याला देता आला? तरी कुणी कुठून निवडणूक लढवली, याच्या पंचायती तुम्ही करणार? अहो शरद पवार साहेब, आमचे चंद्रकांतदादा पक्षानं सांगितलं तिथून लढले, जिंकलेही! तुमची हिंमत माढ्यात दिसलीच... "

हेही वाचा: Maharashtra Politics : निलेश राणे Vs संजय राऊत; आजी-माजी मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ!

हेही वाचा: G20 Summit Pune : परदेशी पाहुण्यांना ढोल-ताशाची भुरळ! पाहा PHOTOS

पवार काय म्हणाले होते?

शरद पवार चंद्रकांत पाटलांबद्दल बोलताना म्हणाले की, ते फार शक्तिमान गृहस्थ आहेत. त्यांचे एक घर कोल्हापूर येथे आहे. कोल्हापूर सोडून कोथरूड येथे त्यांना यावे लागले. कोथरूडमध्ये त्यांचे काय योगदान होते त्याबद्दल कोथरूडकरांनाच विचारलेले बरे राहील. तसेच, ज्या माणसाची स्वतःच्या जिल्ह्यातून निवडूण येण्याची क्षमता नाही. त्यांच्यावर काय भाष्य करावे अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.