चित्रा वाघ यांचा पत्ता कट, विधानपरिषदेसाठी बावनकुळेंना संधी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chandrashekhar bavankule

चित्रा वाघ यांचा पत्ता कट, विधानपरिषदेसाठी बावनकुळेंना संधी!

येणाऱ्या काळात विधानपरिषदेसाठी पार पडणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपने माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्याचं ठरवलं आहे. त्यांच्यासोबत कोल्हापुरातून अमल महाडीक यांची नावं जाहीर झाली आहेत. अमल महाडिकांना टक्कर देण्यासाठी सतेज पाटील असणार आहेत.

अनेक दिवसांपासून विधानपरिषदेसाठी मुंबईतून चित्रा वाघ यांच्या नावाची चर्चा होती. वाघ यांना यंदा परिषदेसाठी संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण त्यांचा पत्ता कट झाला आहे. मुंबईतून राजहंस सिंह यांना संधी देण्यात आली आहे. तर विदर्भात भाजपने बानवकुळेंचं राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केलाय.

भाजपमधून पंकजा मुंडे यांना संधी दिली जावी अशी मुंडे समर्थकांची इच्छा होती. मात्र, भाजपच्या अंतर्गत ओबीसी राजकारणात बावनकुळेंनी बाजी मारली. याआधी गोपीचंद पडळकर यांना परिषदेवर पाठवण्यात आलं होतं. आता बावनकुळेंच्या नावाची घोषणा झाली आहे. पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार हे ओबीसी चेहरे पहिल्यापासून भाजपचं नेतृत्व सांभाळत होते. आता बावनकुळेंच्या एन्ट्रीमुळे अंतर्गत समीकरणं बदलण्याची शक्यता वाढली आहे.

याशिवाय, अकोला,बुलडाणा आणि वाशिममधून भाजपने वसंत खंडेलवाल आणि धुळे-नंदुरबारमधून अमरीश पटेल यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर, मुंबई महापालिकेतून दोन जागा विधान परिषदेवर निवडून द्यायच्या आहेत. यात शिवसेनेने सुनील शिंदेंना उमेदवारी दिली आहे. भाजपचे राजहंस सिंह व शिंदे बिनविरोध निवडून जाणार का, हे पाहावं लागेल.

टॅग्स :chandrashekhar bawankule