Chandrashekhar Rao : 'अबकी बार किसान सरकार' नांदेडमध्ये चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrashekhar Rao : 'अबकी बार किसान सरकार' नांदेडमध्ये चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा

Chandrashekhar Rao : 'अबकी बार किसान सरकार' नांदेडमध्ये चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा

नांदेडः तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव याची नांदेडमध्ये जाहीर सभा सुरु आहे. बाभळी पाणीप्रश्नाच्या निमित्ताने चंद्रशेखर राव यांची महाराष्ट्रात सभा होत आहे.

यावेळी बोलतांना 'अब कि बार किसान सरकार' अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. देशामध्ये आज परिवर्तनाची गरज असून शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या ह्या महाराष्ट्रात होत असल्याचं केसीआर यांनी यावेळी सांगितलं.

चंद्रशेखर राव काय म्हणाले?

  • देशात आता शेतकऱ्यांचं सरकार यायला पाहिजे

  • शेतकऱ्यांनी आता कायदे बनवायला सुरुवात केली पाहिजे

  • महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होतात, हे दु्र्दैव

  • शेतकरी आत्महत्येबाबत सरकारने उत्तरं दिली पाहिजेत

  • काँग्रेस गेलं आणि भाजप आलं, पण प्रश्न सुटले का?

  • कधी हा घोटाळा तर कधी तो घोटाळा

  • कधी अंबानी तर कधी अदाणी, असं सुरुय

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही देशातील अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठीही पाणी उपलब्ध नाही. शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्र पुढे आहे, ही खेदाची बाब आहे. असं राव म्हणाले.

टॅग्स :Nandedchandrashekhar rao