Imtiyaz Jaleel: "राज्यातील 'या' शहरांची नावही बदला"; जलील यांनी दिले 'हे' पर्याय

नुकतेच औरंगाबाद आणि उस्मानाबद शहरांचं नामांतर करण्यात आलं आहे.
Imtiyaz Jaleel Latest marathi News
Imtiyaz Jaleel Latest marathi NewsImtiyaz Jaleel Latest marathi News

छ्त्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याचं नामांतर छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशीव केल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे आक्रमक झाले आहेत. आता राज्यातील इतर जिल्ह्यांचीही नावं बदला अशी खोचक मागणी त्यांनी सरकारकडं केली आहे. यासाठी त्यांनी नावांचे पर्यायही सुचवले आहेत. (Change name of other cities also in Maharashtra Imtiyaz Jaleel gave options)

Imtiyaz Jaleel Latest marathi News
Manish Sisodia Arrest: सुप्रीम कोर्टात गेलेल्या सिसोदियांना दिलासा नाहीच! अटकेविरोधात घेतली होती धाव

जलील म्हणाले, "आपलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे मुंबई या शहराचं बॉम्बे हे नाव बदलून मुंबई केलं. मुंबईतून काही विशेष अर्थ निघत नाही. जर महापुरुषांच्या नावावर शहरांची नावं ठेवायची आहेत. तर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर तुम्ही मुंबईचं नाव बदला"

Imtiyaz Jaleel Latest marathi News
Shinde Vs Thackeray : सत्ता संघर्षाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं? जाणून घ्या सविस्तर

तसेच मुंबईसह राज्यातील पुणे, नागपूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांची नावंही आता बदला. यासाठी मुंबईचं नाव 'छत्रपती शिवाजी महाराज नगर', नागपूरचं नाव 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर', पुण्याचं नाव महात्मा फुलेनगर तर कोल्हापूरचं नाव शाहूनगर करा अशी मागणीही जलील यांनी केली आहे.

हे ही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

दरम्यान, केंद्र सरकारनं नुकताच राज्य शासनाचा जिल्ह्यांची नावं बदलण्याच्या प्रस्ताव मंजुरी दिली. त्यानुसार औरंगाबाद शहरासह जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजी नगर तर उस्मानाबाद शहरासह जिल्ह्याचं नाव धाराशीव असं करण्यात आलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा या शहरांची नावं बदलण्याची मागणी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com