Maharashtra Politics : इथे ओशाळली प्रथा-परंपरा; अनिल परबांच्या वक्तव्याचे पडसाद, सत्ताधारी-विरोधकांत अर्वाच्य शब्दफैरी
Anil Parab : अनिल परब यांच्या वक्तव्यावरून विधान परिषदेत तुफान गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर अश्लील आणि अर्वाच्य शब्दांचा मारा करत परंपरांना काळिमा फासला.
महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केलेल्या अटकेपासून शिवसेना फुटीपर्यंतचे धुमसणारे निखारे आज पुन्हा विधान परिषदेत भडकले. त्याचा स्तर इतका घसरला की नळावरच्या भांडणालाही लाजवेल, अशी पातळी गाठली गेली.