esakal | भुजबळांच्या सुटकेला मी हायकोर्टात चॅलेंज करणार - अंजली दमानिया
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan bhujbal

छगन भुजबळ निर्दोष मुक्तता : अंजली दमानीयांचं आव्हान!

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

नाशिक : रायगड जिल्ह्यातील साल 2015 मधील एका विकास प्रकल्पाशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांचे पुत्र पंकज (pankaj bhujbal) आणि पुतण्या समीर भुजबळ (sameer bhujbal) यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयानं दोषमुक्त केलं आहे. या दोघांसह अन्य दोन विकासकांनाही न्यायालयानं दिलासा देत दोषमुक्त केलं आहे. या निर्णयानंतर अंजली दमानिया (anjali damaniya) यांनी एक ट्विट केलं आहे. अंजली दमानिया यांनी ट्विट करत हायकोर्टात दाद मागणार असल्याचं म्हटलं आहे

नेमकं काय घडलं होतं?

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सर्वप्रथम एसीबीकडून गुन्हा दाखल त्यानंतर ईडीकडून तपास सुरू करण्यात आला. भुजबळांची 200 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. तपासा दरम्यान भुजबळांच्या विरोधात सबळ पुरावे आढळून आल्याचं म्हटलं गेलं सुधारित कलमे लावून खटला मजबूत करण्यात आला यानंतर 2016 ते 2018 या कालावधीत छगन भुजबळ यांना जेलमध्ये जावं लागलं होतं 4 मे 2018 मध्ये भुजबळांना जामीन मंजूर झाला

loading image
go to top