Chhagan Bhujbal Sakal
महाराष्ट्र बातम्या
Chhagan Bhujbal : भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा
Maharashtra Cabinet : छगन भुजबळ यांची राज्य मंत्रिमंडळात नियुक्ती होऊन त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला असून अतुल सावे यांच्याकडे दिव्यांग कल्याण विभाग देण्यात आला आहे.
मुंबई : राज्यमंत्रिमंडळात नव्याने समाविष्ट करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या या खात्याचा कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होता.