Nashik News: नाशिकला जन्म झाल्यामुळे मी येथील बालक आहे. पण पालक होईल किंवा नाही, याविषयी मला काही सांगता येत नाही. बालक तुमच्यासोबत आहे. त्यावर एकवेळ मुख्यमंत्री यांच्याशी बोलेल. पण आपले कोणतेच काम अडणार नाही. जे कारभारी असतील त्यांना आपण सांगू. गेल्यावेळीदेखील दुसरे पालकमंत्री होते. तरी त्यांना सांगितलेली कामे झाली आहेत. त्यामुळे पालकमंत्रिपदावरुन वाद न घालण्याचा सल्ला मंत्री छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना गुरुवारी दिला.