Maharashtra Politics: धनंजय मुंडेंकडे नाशिकची जबाबदारी ? डावलल्याच्या बातम्यांबद्दल भुजबळ स्पष्टच बोलले

पवारांच्या मनात नेमकं काय? नाशिकची जबाबदारी धनंजय मुंडेंकडे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
chhagan bhujbal
chhagan bhujbal

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळालंय. त्यानंतर महाराष्ट्रात महाविकासआघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने उरले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली आहे. राष्ट्रवादीने आपल्या नेत्यांकडे 18 जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे. यावेळ नाशिक जबाबदारीचा मुद्दा राजकीय वर्तुळात चांगलाच गाजला. पण भुजबळ यांनी या सर्व चर्चांना फटकारलं आहे. (chhagan bhujbal on Sharad Pawar gives Nashik district NCP responsibility to Dhananjay Munde maharashtra politics)

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीच राष्ट्रवादीने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून, त्यानुसार जबाबदारीचे वाटप करताना नाशिकची जबाबदारी ही याच जिल्ह्यातील स्थानिक नेते असलेल्या आणि माजी उपमुख्यमंत्री असलेल्या छगन भुजबळ यांना डावलून थेट धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चेला पुर्णविराम देण्याचा प्रयत्न भुजबळ यांनी केला आहे. काही लोकांकडून गैरसमज पसरवला जात आहे. पुण्यात शेळकेंना जबबादारी दिली म्हणून अजित पवार यांना काही होणार आहे का ? असा उलट सवाल उपस्थित करत नवीन लोकांवर जबाबदारी दिली जात आहे. असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

नाशिक म्हटले की छगन भुजबळ हे सर्वेसर्वा मानले जातात. ते ज्येष्ठ नेते असल्याने संघटनेवर त्यांची पकड आहे. मात्र, अशावेळी त्यांना टाळून धनंजय मुंडे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नवीन जबाबदारी दिलेले नेते बुथ प्रमुखांच्या पडताळणीपासून अन्य कामे करणार आहेत, त्यामुळे भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला या कामांची जबाबदारी दिलेली नाही, असे यासंदर्भात राष्ट्रवादीच्या वतीने सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com