संजय राऊत थोडक्यात वाचले, छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

chhagan bhujbal on shivsena sanjay raut rajya sabha election result 2022
chhagan bhujbal on shivsena sanjay raut rajya sabha election result 2022

नाशिक : राज्यात नुकतेच राज्यसभेची निवडणूक पार पडली. या निवडणूकीच्या निकालानंतर देखील राजकीय वर्तुळात आरोप - प्रत्यारोप होतच आहेत. दरम्यान या निवडणूकीत मविआच्या 3 तर भाजपच्या 3 उमेदवारांचा विजय झाला आहे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी लढत चुरशीची झाली यामध्ये भाजपचे धनजंय महाडिक आणि शिवसेनेचे कोल्हापूरचे उमेदवार संजय पवार यांच्यात लढत झाली, ज्यामध्ये भाजपच्या महाडिकांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. दरम्यान या विजयानंतर राजकीय क्षेत्रातून नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

राज्यसभेच्या या अटीतटीच्या निवडणूकीत शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांचा तर भाजपच्या अनिल बोंडे आणि पीयुष गोयल यांना विजय मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही राज्यसभा निकालावर बोलताना, संजय राऊत थोडक्यात वाचले, नाहीतर उलटे झाले असते अशी प्रतिक्रिया दिलीय, भुजबळ म्हणाले की, संजय पवार निवडून आले असते आणि राऊत मागे राहिले असते. संजय राऊत यांनी आता अपक्षांची नाव घेऊन त्यांना आणखी दुखवण्यापेक्षा लोकांना जवळ करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

chhagan bhujbal on shivsena sanjay raut rajya sabha election result 2022
राजू शेट्टी राऊतांवर भडकले, तो आमदार स्वाभिमानीचा नाही...

भुजबळ म्हणाले की, महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून यावेत, यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. पण दुर्दैवाने चौथ्या उमेदवाराचा पराभव झाला. पण महाविकास आघाडीला हा मोठ्ठा धक्का आहे असे नाही, आमच्याकडे 166 पेक्षा जास्त आमदार होते. आम्ही नियोजनात चुकलो, असेही त्यांनी सांगितले.

भाजपने दोन उमेदवारांना 48/ 48 मते दिली, पहिल्या फेरीनंतर ज्याला जास्त मतं आहेत, त्याची मत इतरांना ट्रासन्फर होतात. भाजपची मते ट्रान्स्फर झाली, आमची मते ट्रान्स्फर होण्याचा योगच आला नाही. संजय राऊत यांनाच अडचण निर्माण होते का? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. महत्वाच्या नेत्यांना आधी सेफ करायला पाहिजे होते. आम्ही 170 पेक्षा 180 मंतांची व्यवस्था करायला पाहिजे होते, यात कमी पडलो, असे भुजबळ म्हणाले.

chhagan bhujbal on shivsena sanjay raut rajya sabha election result 2022
Monsoon : राज्यात येत्या 5 दिवसांत मुसळधार पाऊस, IMD ची माहिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com