esakal | महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण : दोषमुक्त झाल्यानंतर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan-Bhujbal

महाराष्ट्र सदन प्रकरण : दोषमुक्त झाल्यावर भुजबळांची प्रतिक्रिया

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात (maharashtra sadan scam case) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (minister chhagan bhujbal) यांना दोषमुक्त करण्यात आले आहे. मुंबई सत्र न्यायालयाने या संदर्भातील निकाल दिला आहे. छगन भुजबळ यांच्यासह एकूण सहा जणांना न्यायालयाने दोषमुक्त केलं आहे. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा: महाराष्ट्र सदन घोटाळा नेमका काय?

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी दोषमुक्त झाल्यानंतर भुजबळ म्हणाले, '' महाराष्ट्र सदन हे फाईव्ह स्टार हॉटेलसारखं बांधण्यात आलं. गेल्या ८ वर्षांपासून देशातील अनेक पक्ष त्याचा वापर करतात. त्याठिकाणी सर्व फर्निचरसह आपण व्यवस्था केली आहे. ते बांधून दिल्यानंतर १०० कोटी रुपयांचा एफएसआय किंवा जमीन कंत्राटदाराला देऊ, असे सांगितले होते. मात्र, आतापर्यंत कंत्राटदाराला काहीही मिळाले नाही. तरीसुद्धा आमच्यावर आरोप करण्यात आले. ८०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. मीडिया ट्रायल देखील घेण्यात आली. ईडीची कारवाई सुद्धा झाली. शेवटी मला आणि समिरला सव्वादोन वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहावं लागलं. गेल्या वर्षभर सत्र न्यायालयात केस सुरू होती. त्यामध्ये आम्हाला वगळण्यात यावं. त्यात आमचा काही दोष नाही, अशी मागणी आम्ही केली होती. आता न्यायालयाने आम्हाला दोषमुक्त घोषित केले. त्याचा आनंद आहे, असे भुजबळ म्हणाले.

सत्य परेशान हो सकता हैं, पराजित नहीं -

वकिलांनी सत्य काय आहे हे न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. यामध्ये एक रुपयाही कोणाला मिळाला नाही. त्यानंतर आम्हाला दोषमुक्त घोषित करण्यात आले. आता ईडीची कारवाई महाराष्ट्र सदनमध्ये ८०० कोटी घोटाळ्याप्रकरणी संबंधित आहे. त्यामुळे त्यामधूनही दिलासा मिळेल. 'सत्य परेशान हो सकता हैं लेकीन पराजित नहीं.' आज ना उद्या न्याय मिळेल. विनम्रपूर्वक आणि संयमपूर्वक आम्ही न्यायालयाचा निर्णय स्विकारत आहोत. कोणाबद्दलही तक्रार नाही. नियतीच्या मनात असतं तसं घडतं. दिवस येतात ते भोगावे लागतात. आमच्या वाट्याला आले, आम्ही त्याला तोंड दिले, असेही भुजबळ म्हणाले.

loading image
go to top