Chhagan Bhujbal on Threat Call: पवार कुटुंबीय अशी धमकी देण्याचं काम करीत नाहीत, धमकी प्रकरणावर भुजबळांनी केलं स्पष्ट

छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी
Chhagan Bhujbal on Threat Call
Chhagan Bhujbal on Threat CallEsakal
Updated on

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे . यादरम्यान अजित पवारांसोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतलेले नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. (Marathi Tajya Batmya)

मिळलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने भुजबळ यांच्या कार्यालयात फोन करून आपल्याला सुपारी मिळाल्याचा दावा फोनवरून केला आहे. यासंदर्भातील ऑडिओ क्लिप देखील समोर आली असून घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यात दौऱ्यावर असताना रात्री साडे अकराच्या सुमारास धमकीचा फोन आला. या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली असून, पुढील कारवाई सुरू आहे.

Chhagan Bhujbal on Threat Call
Death threat to Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी! राजकीय वर्तुळात खळबळ

या प्रकरणी प्रशांत दशरथ पाटील या आरोपीला पुणे पोलिसांनी रायगड येथील महाडमधून अटक केली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून यावर छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. या प्रकरणी छगन भुजबळ यांना प्रश्न विचारण्यात आला होता. (Marathi Tajya Batmya)

Chhagan Bhujbal on Threat Call
Ajit Pawar: शरद पवारांना मोठा झटका! फसवून सही घेतली म्हणणारे आमदार पुन्हा अजित पवारांच्या गोटात दाखल

त्यावर भुजबळ म्हणाले की, 'माझ्या सहकाऱ्याने मला धमकी आल्याचे सांगितले आहे. त्याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर काही तासांत आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीकडे चौकशी केल्यावर माहिती समोर येईलच. पण मी कार्यकर्त्यांना एकच सांगतो की, शरद पवार किंवा त्यांचं कुटुंबीय अशी धमकी देण्याचं काम करीत नाही. वैचारिक लढाई सुरू असते. अशी कामे अतिउत्साही लोक करीत असतात असंही ते म्हणाले आहेत.

Chhagan Bhujbal on Threat Call
PM Modi Tilak Award: मोदींना पुरस्कार देणं यात हरकत काय? काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.