Crime News : थरार! प्रेमसंबंधाच्या संशयावरुन दोन सख्ख्या भावांनी केली बहिणीची हत्या; कुऱ्हाडीने घातले घाव

aurangabad crime news
aurangabad crime newsesakal

छत्रपती संभाजी नगरः सोयगाव तालुक्यातील फर्दापूरपासून जवळ असलेल्या अजिंठा डोंगर रांगेत असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारात एक संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी फर्दापूर पोलीस ठाण्यात एकूण 4 जणांच्या विरोधात गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे.

चंद्रकला धोडिंबा बावस्कर (वय 35 वर्षे, रा. तोंडापूर, ता. जामनेर) असे मयत महिलेचं नाव आहे. आरोपींमध्ये महिलेचा भाऊ कृष्णा धोडिंबा बावस्कर आणि शिवाजी धोडिंबा बावस्कर, वडील धोडिंबा सांडू बावस्कर आणि आई शेवंताबाई धोडिंबा बावस्कर यांचा समावेश आहे.

aurangabad crime news
Ganesh Utsav : अंधेरीचा राजा! गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाण्यापूर्वी 'हे' नियम पाळा; मंडळाचा अजब फतवा

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकला बावस्कर यांचे प्रेमसंबंध असल्याचा तिच्या आई-वडील आणि भावांना संशय होता. दरम्यान, शनिवारी सकाळी राक्षा शिवारात शमीम शाह कासम शाह (वय 30 वर्षे, रा. तोंडापूर, ता. जामनेर) हे शनिवारी आपल्या शेतात काम करत होते. याचवेळी तिथे अचानक चंद्रकला बावस्कर धावत आल्या. प्रचंड घाबरलेल्या चंद्रकला यांनी 'माझे भाऊ आणि आई वडील प्रेमसंबंधांच्या कारणावरून माझा जीव घेणार आहे. त्यामुळे, मला वाचवा, कोठे तरी लपवा, अशी त्यांनी शमीम यांच्याकडे विनवणी केली. त्यामुळे शमीम यांनी तिला त्यांच्या बकऱ्याच्या शेडमध्ये लपण्यास सांगितले.

aurangabad crime news
Eknath Shinde : मनोज जरांगेंची मागणी असली, तरी मराठ्यांना OBC तून सरसकट आरक्षण मिळणार नाही; CM शिंदेंचं मोठं विधान

दरम्यान, काही वेळात चंद्रकला यांचे भाऊ कृष्णा धोडिंबा बावस्कर आणि शिवाजी धोडिंबा बावस्कर हे दोघे तिथे धावतच आले. त्यांच्या हातात कुऱ्हाड होती. त्यांनी शेडमध्ये पाहणी करून अखेर चंद्रकला यांचा शोध घेऊन मारहाण सुरु केली. तसेच हातात असलेल्या कुऱ्हाडीने चंद्रकला यांच्या डोक्यात घाव घातले. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याचवेळी तिथे चंद्रकला यांचे आई वडील देखील आले. त्यांनी शमीम यांना मारहाण करत दोन्ही मुलांना चंद्रकलाला जिवंत ठेऊ नका असे सांगितले. दरम्यान, शमीमने त्यांच्या तावडीतून सुटले आणि थेट पोलीस ठाण्यात पोहचले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. विशेष म्हणजे प्रेमसंबंधावरून ही हत्या करण्यात आल्याचं पोलिसांच्या चौकशीत समोर आहे.

बावस्कर भावांच्या तावडीतून सुटलेले शमीम सुरुवातीला थेट पहूर पोलिस ठाण्यात पोहचले. यावेळी त्यांनी पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. मात्र, घटनास्थळ फर्दापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने पहूर पोलिसांनी तत्काळ घटनेची माहिती फर्दापूर पोलिसांना दिली. माहिती मिळताच, फर्दापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला.

तर, सिल्लोडचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. सदरचा गुन्हा फर्दापूर पोलिसांनी अवघ्या तीन तासांमध्ये उघड करून सदर गुन्ह्यातील चार आरोपी यांना अटक केलेली असून सध्या सदर गुन्ह्यातील आरोपी दिनांक 20 तारखेपर्यंत पीसीआर मिळालेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com