
नवी दिल्लीः छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित १२ किल्ल्यांचा अखेर युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे. काही वेळापूर्वीच महाराष्ट्रातील शिष्टमंडळाची युनेस्कोच्या सदस्यांसोबत एक बैठक झाली. त्यानंतर युनेस्कोने शिवरायांच्या किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा यादीमध्ये करण्याची घोषणा केली. याबाबत राज्य किंवा केंद्र सरकारने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे.