

Sambhaji Shahaji Bhosale: Shivaji Maharaj's elder brother, brave warrior killed in Kanakgiri battle due to Afzal Khan's treachery. Know his life, sacrifice, and legacy.
esakal
Chhatrapati Shivaji Maharaj Brother Life Story : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऊर भरून येणाऱ्या इतिहासात त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे योगदान अमूल्य आहे. शिवरायांचे थोरले बंधू संभाजी शहाजी भोसले (Sambhaji Shahaji Bhosale) हे एक असेच अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. ज्यांच्या शौर्याचा वारसा स्वराज्य स्थापनेच्या पायाभरणीत अत्यंत महत्त्वाचा ठरला. १६२३ मध्ये जन्मलेले संभाजीराजे हे शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊंचे थोरले सुपुत्र होते. त्यांचे बालपण आणि तारुण्य वडिलांसोबत दक्षिण दिग्विजयात आणि आदिलशाहीतील लष्करी मोहिमांमध्ये गेले.