Prasad Lad: प्रसाद लाड यांच्या विधानावर प्रविण दरेकर यांची सरवासारव, म्हणाले..." | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prasad Lad

Prasad Lad: प्रसाद लाड यांच्या विधानावर प्रविण दरेकर यांची सरवासारव, म्हणाले..."

Bharatiya Janata Party: एकीकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहे. त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. अशातच, आणखी एका नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मासदंर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

(Chhatrapati Shivaji Maharaj Controversial statement Prasad Lad)

हेही वाचा: Maharashtra- Gujrat : नाशिक जिल्ह्यातील गावांना 'या' कारणामुळे व्हायचयं गुजरातमध्ये सामील

आधीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल राज्यपालांनी केलेल्या विधानामुळे राज्यात गदारोळ सुरू आहे. यात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. त्यामुळे आता पुन्हा भाजप आडचणीत सापडणार आहे.

हेही वाचा: Prasad Lad: भाजपच्या अडचणीत वाढ? शिवरायांचा जन्म कोकणात; प्रसाद लाडांचे वादग्रस्त वक्तव्य

भाजप नेत्यांकडून वारंवार शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त विधान करून पुन्हा सारवासारक करतात. अशातच प्रसाद लाड यांची पाठराखन प्रविण दरेकर यांनी केली आहे. लाड यांच्या विधानावर दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले की,"प्रसाद लाड यांचं वक्तव्य अनावधानाने बोललेले होते, चूक लक्षात येताच लाड यांनी वक्तव्य सावरलं, ते वक्तव्य जाणाव पुर्वक नव्हत असं प्रविण दरेकर यांनी म्हणाले आहे" त्यामुळे आत सर्वच क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत.

टॅग्स :BjpPravin Darekar