Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त अकोल्यातून रायगडावर पालखी निघाली. ही पहिली मानाची पालखी असल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर शिवभक्तांनी गर्दी केली होती.
पाली (वार्ताहर) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने अकोल्यातून रायगड किल्ल्यावर मानाची पालखी निघाली आहे. शिवराय ग्रुप अकोलाच्या वतीने मंगळवारी (ता. ३) रात्री या पालखीचे पूजन करून रायगडाकडे रवाना झाले.