
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याचे राजे म्हणून कामकाज पाहताना परकीय राज्यकर्त्यांमुळे मराठी भाषेवर झालेले आक्रमण दूर करण्यासाठी मराठी भाषेच्या शुद्धीकरणाची ऐतिहासिक चळवळ सुरू केली होती. परकीय भाषेतील शब्द कमी करून मराठीचा अधिकाधिक वापर करण्यासाठी पुढाकार घेत आपले पत्रव्यवहार आणि एकूणच कामकाज मराठीतून करण्यासाठी पाऊले उचलल्यानेच मराठी भाषेला जीवदान मिळाले असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.