Ahmednagar News:तलावात मोटारी टाकू नका ! ग्रामपंचायतीच्या शेतकऱ्यांना सूचना, केळ तलावात फक्त २५ टक्के पाणी

नगर तालुक्यातील केळ तलावात फक्त २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे परिसरात दुष्काळाचे सावट आहे.
Ahmednagar News:तलावात मोटारी टाकू नका ! ग्रामपंचायतीच्या शेतकऱ्यांना सूचना, केळ तलावात फक्त २५ टक्के पाणी
Updated on

Ahmednagar News:नगर तालुक्यातील केळ तलावात फक्त २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे परिसरात दुष्काळाचे सावट आहे. यासाठी पाणी जपून वापरावे लागणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी तलावात मोटारी टाकू नयेत; अन्यथा कारवाई करण्याचा इशारा लघू पाटबंधारे विभागाने दिला आहे.

नगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी पाऊस कमी झाल्याने येत्या काही दिवसांत दुष्काळाचे सावट आहे. चिचोंडी पाटील, भातोडी, दौलावडगाव शिवारात केळ तलाव आहे. या तलावातून चिचोंडी पाटील गावाला पिण्याच्या पाण्याची योजना आहे. यंदा झालेल्या थोड्या पावसात तलावात ३० टक्के पाणीसाठा उपलब्ध झालेला होता. या पाणीसाठ्यावर तब्बल ६ ते ७ महिने पिण्याची पाण्याची योजना चालवायची आहे. याबाबत ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नगर तहसील, लघू पाटबंधारे विभागाला पत्रव्यवहार केलेला आहे.

सध्या तलावात २५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तो पाणीसाठा चिचोंडी पाटील ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित केलेला आहे. त्यामुळे केळ तलाव परिसरात चिचोंडी पाटील, भातोडी, दौलावडगाव येथील शेतकऱ्यांनी यावर्षी तलावात थेट मोटारी टाकू नयेत. सर्व ग्रामस्थांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, अशी विनंती सरपंच शरद पवार, उपसरपंच जयश्री महादजी कोकाटे यांच्यासह सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी, पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडून केलेली आहे. (Latest Marathi News)

Ahmednagar News:तलावात मोटारी टाकू नका ! ग्रामपंचायतीच्या शेतकऱ्यांना सूचना, केळ तलावात फक्त २५ टक्के पाणी
Mukesh Ambani Threat: मुकेश अंबानी धमकी प्रकरणात आणखी एकाला अटक; तेलंगणानंतर गुजरातमध्ये कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com