'फूट पडल्यावर दरवेळी पक्ष..'; सत्तासंघर्षावर सरन्यायाधीशांचं मोठं विधान I Political Crisis | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Political Crisis

मंगळवारी ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि मनु सिंघवी यांच्याकडून जोरदार युक्तीवाद झाल्यानंतर आता शिंदे गटाकडून नीरज कौल यांचा युक्तीवाद सुरू आहे.

Political Crisis : 'फूट पडल्यावर दरवेळी पक्ष..'; सत्तासंघर्षावर सरन्यायाधीशांचं मोठं विधान

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीला आज सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुरुवात झालीये.

ही सुनावणी अंतिम टप्प्यात आली असून, याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) युक्तिवाद आणि सुनावणी पूर्ण होणार आहे. याच आठवड्यात हे प्रकरण संपवायचं आहे, असं महत्त्वपूर्ण वक्तव्य सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केलंय.

आज सुनावणीचा दुसरा दिवस आहे. शिंदे गटाकडून नीरज किशन कौल हे युक्तिवाद करत आहेत. युक्तिवादादरम्यान आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud) यांनी मोठी टिप्पणी केलीये.

फूट पडल्यावर दरवेळी पक्ष सोडला जातोच, असं नाही. दहाव्या सूचीनुसार विचार करता दोन गट आहेतच, अशी महत्वपूर्ण टिप्पणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केली आहे. तसेच 21 जूनलाच पक्षात दोन गट पडल्याचं म्हटलं.

मंगळवारी ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि मनु सिंघवी यांच्याकडून जोरदार युक्तीवाद झाल्यानंतर आता शिंदे गटाकडून नीरज कौल यांचा युक्तीवाद सुरू आहे. काल राज्यपालांचे बहुमत चाचणीचे पत्र न्यायालयानं रद्द ठरवावं, अशी मागणी ठाकरे गटाकडून झाली होती. तर या पत्राचे शिंदेगटाकडून समर्थन करण्यात आलं होतं.

आज नीरज कौल यांनी सिब्बल आणि सिंघवी यांचा युक्तिवाद खोडून काढत शिवसेनेत 21 जूनलाच दोन गट पडले होते. याकडे लक्ष वेधलं. तसंच त्यांनी मध्यप्रदेशच्या शिवराजसिंग चौहान खटल्याचा दाखला देखील दिला.