Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे करणार युतीची घोषणा- चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे करणार भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीची घोषणा करणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडून युती होणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले असून, मुख्यमंत्री नागपूरहून परतल्यावर युतीची घोषणा करण्यात येणार असल्याचे पाटील म्हणाले. 

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे करणार भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीची घोषणा करणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडून युती होणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले असून, मुख्यमंत्री नागपूरहून परतल्यावर युतीची घोषणा करण्यात येणार असल्याचे पाटील म्हणाले. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, युतीचे जागावाटप पूर्ण झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे युतीची घोषणा करतील. युती झालेलीच आहे फक्त औपचारिक घोषणा बाकी असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.  मी कोथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार हे निश्चित झाले असल्याचेहीपाटील यांनी सांगितले.

युतीच्या घोषणेसाठी पत्रकार कोणत्याही प्रकारची परिषद होणार नाही तर काही वेळात प्रसिद्ध पत्रक जाहीर करण्यात येईल, प्रसिद्धीपत्रकाद्वारे युतीची घोषणा करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे. तसेच, भाजप उमेदवारांची यादीही दिल्लीतूनच जाहीर होणार असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister and Uddhav Thackeray to announce alliance says Chandrakant Patil