Narendra Modi Mumbai Visit : मोदींना हसू आवरेना; मुख्यमंत्री शिंदेंचा 'दावोस'मधला 'तो' किस्सा काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi Mumbai Visit

Narendra Modi Mumbai Visit : मोदींना हसू आवरेना; मुख्यमंत्री शिंदेंचा 'दावोस'मधला 'तो' किस्सा काय?

मुंबईः विविध विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यासाठी देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पुढच्या अडीच वर्षांमध्ये संपूर्ण मुंबई खड्डेमुक्त होईल, अशी ग्वाही देत एकनाथ शिंदे यांनी मुंबईचा कायापालट करणार असल्याचं म्हटलं आहे. २५ ते ४० वर्षे रस्त्याला खड्डा पडणार नाही अशी रस्ते आम्ही करत आहोत. मात्र काही लोकांना असे रस्ते नको होते, त्यांना विकास नको होता असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

दावोसमध्ये लोक फक्त मोदी..मोदी करत होते- शिंदे

दावोसमध्ये विविध देशातले लोक आले होते. मला अनेक लोक भेटले. काही पंतप्रधान होते काही मंत्री होते. ते फक्त आणि फक्त मोदींबद्दल विचारायचे. एक पंतप्रधान भेटले, मला म्हणाले मी मोदींचा भक्त आहे. माझ्यासोबत त्यांनी फोटो घेतला आणि म्हणाले मोदींना हा फोटो दाखवा. जर्मनी, सौदीचे लोक भेटले ते म्हणाले तुम्ही मोदीजींसोबत आहात ना? मी म्हणाले आम्ही त्यांचेच लोक आहोत. मोदींचा करिष्मा जगभरात पसरला असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे हा किस्सा सांगत असतांना खुद्द पंतप्रधानांनाही हसू आवरलं नाही. सभेसाठी उपस्थित लोकांनी एकच मोदी-मोदीच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. आपल्याकडे G-20चं प्रमुखपद आल्याने देशाचा सन्मान वाढल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.