Eknath Shinde : '...म्हणून मी मुख्यमंत्री झालो', एकनाथ शिंदेंनी सांगितलं CMपदी बसण्याचं कारण Chief Minister Eknath Shinde said the reason for sitting as CM | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

Eknath Shinde : '...म्हणून मी मुख्यमंत्री झालो', एकनाथ शिंदेंनी सांगितलं CMपदी बसण्याचं कारण

शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार यांनी भाजपसोबत नवीन सरकार स्थापन केलं. या युतीच्या सरकारमध्ये शिंदे गटाचे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी बसले तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे झाले? कोणत्या कारणामुळे शिंदे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसले? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर का बसले याचं उत्तर एकनाथ शिंदे यांनी एकाच वाक्यात दिलं आहे. “एकदा शब्द दिला की मी मागे फिरत नाही. तो शब्द पाळलाच जावा असा माझा अट्टहास असतो. म्हणून मी मुख्यमंत्री झालो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. त्याचबरोबर जनता आपल्याला निवडून देते. त्यामुळे जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात यावेत. लोकोपयोगी कामं व्हावीत, हाच माझा ध्यास आहे, असंही शिंदे म्हणाले आहेत.

ठाण्यात राष्ट्रावादी काँग्रेसच्या ६ माजी नगरसेवकांनी काल रात्री बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. सहा माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी यावेळी ठाण्यात जोरदार शक्तीप्रदर्शनही केलं. हनुमंत जगदाळे यांनी लोकमान्यनगर इथं शक्तीप्रदर्शन करत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.

प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये हणमंत जगदाळे (ज्येष्ठ नगरसेवक), राधाबाई जाधव (नगरसेवक), दिगंबर ठाकुर (नगरसेवक) ,वनिता घोगरे (नगरसेवक), संभाजी पंडीत (नगरसेवक), संतोष पाटिल (परीवहन सदस्य) आणि वरीष्ठ पदाधिकारी सुधाकर नाईक, पुरषोत्तम ठाकुर, राजा जाधव, संदिप घोगरे, मंगेश ठाकुर यांचा समावेश आहे.