फक्त भाजपच्याच पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

सोलापूर : राज्याची दुष्काळी स्थिती, गेल्या अनेक वर्षांपासून मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणावरून राज्यभर निर्माण झालेला आक्रोश या सर्वांची धास्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात आजही असल्याचे प्रकर्षाने दिसले. विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी भाजपचे मंत्री, खासदार आणि भाजपच्या महापौर यांच्याशी संवाद साधला. 

त्यांच्या या दौऱ्यानिमित्त सोलापूर शहर व जिल्हा पोलिसांनी कमालीचा बंदोबस लावला होता. सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे अडकलेल्या एफआरपीची रक्कम, जिल्ह्यातील ऊसाला लागलेली हुमनी, जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती यासह अनेक प्रश्नांवर जिल्ह्यातील जनतेचे लक्ष मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्याकडे लागले होते. आपल्या भावना थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचतील अशी भाबडी आशा घेऊन विविध संघटना व शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. मुख्यमंत्री हवेत आले आणि हवेतच (विमानाने) गेले. सर्वसामान्य जनतेचा मात्र भ्रमनिरास झाल्याचे या दौऱ्यातून दिसून येत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister talk with BJP party members only