कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी महाराष्ट्र सज्ज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती
कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी महाराष्ट्र सज्ज
Summary

राज्यात ‘मिशन ऑक्सिजन’ ही मोहिम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिली.

मुंबई : कोरोनाची (Corona) तिसरी लाट थोपवण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलण्यास सुरवात केली आहे. राज्यात ‘मिशन ऑक्सिजन’ (mission oxygen campaign) ही मोहिम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief minister uddhav thackeray) यांनी बुधवारी दिली. (Chief minister uddhav thackeray informed that mission oxygen campaign has been started in maharashtra)

पुढे ते म्हणाले की ऑक्सिजनची निर्मिती, साठवण आणि वितरण या बाबत महाराष्ट्राला स्वावलंबी बनविण्यासाठी ‘महाराष्ट्र - मिशन ऑक्सिजन’ ही मोहीम सुरू कण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रात १८०० टन ऑक्सिजनची आवश्यकता असून यापैकी १,२९५ टन ऑक्सिजनची निर्मिती महाराष्ट्रात होत आहे. सुमारे ५०० टन इतर राज्ये व केंद्र शासनाच्या मदतीने उपलब्ध होत आहे. सद्य:स्थितीत असलेल्या ३८. पीएसए प्लांटस मार्गात ५३ टन ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. तसेच अल्पकाळातील आवश्यकतेचा विचार करता, स्वावलंबी होण्यासाठी राज्यात सुमारे ३८२ अतिरिक्त पीएसए प्लांटसची स्थापना करण्यात येत आहे. त्यातून जवळपास २४० टन ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे ही सर्व कामे युद्धपातळीवर सुरू असून सर्व प्लांट जूनअखेरीस सक्रिय होतील,असेही ते म्हणाले.

कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी महाराष्ट्र सज्ज
जिंदगी, जान उसके बाद काम - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

यानंतर पुढे ठाकरे म्हणाले की, राज्याने कोविड प्रादुर्भावापासून नागरिकांचा बचाव करुन सुरक्षित करण्यासाठी १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या लसीकरणासाठी जवळपास आठ लाख डोस उपलब्ध झाल्या आहेत. आजमितीला या मात्रा जरी कमी असल्या तरी केंद्र शासन व लस उत्पादक कंपन्यांशी दररोज चर्चा करुन अधिकाधिक लस साठा उपलब्ध करुन नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. साधारणतः एक महिन्याच्या कालावधीत राज्याला पुरेसा लस साठा उपलब्ध होऊन लसीकरण सुरळीत होऊ शकेल. यासाठी सर्व नागरिकांनी फक्त पूर्वनियोजित वेळ घेऊनच लसीकरणासाठी संबंधित केंद्रावर जावे. जेणेकरुन अनावश्यक गर्दी टाळता येऊन संसर्ग टाळण्यासाठी मदत होईल. यासाठी लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्याबाबत सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

(Chief minister uddhav thackeray informed that mission oxygen campaign has been started in maharashtra)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com