esakal | '12 आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांशी सकारात्मक चर्चा'
sakal

बोलून बातमी शोधा

'12 आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांशी सकारात्मक चर्चा'

'12 आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांशी सकारात्मक चर्चा'

sakal_logo
By
विनायक होगाडे

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत ही भेट घेतली. आज सायंकाळी साडेसात वाजता झालेल्या या भेटीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात उपस्थित होते. विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा कित्येक महिन्यांपासून प्रलंबित आहे. या मुद्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट झाली. त्यामुळे, या भेटीतून तोडगा निघणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं.

या बैठकीबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, आम्ही गेल्या आठवड्यातच वेळ मागितली होती. पण तेंव्हा काही अडचणीमुळे त्यांनी वेळ दिली नव्हती. त्यावेळी त्यांनी १ तारखेची वेळ दिली होती. त्यानुसार आज आम्ही भेटलो. नेहमीची एक पद्धत असते, त्यानुसार राज्यपालांना राज्यात जे सुरुय त्याबाबत माहिती दिली जाते. त्यानुसार, आता सध्या राज्यात पावसाची जी परिस्थिती आहे ती दिली. पावसाच्या काळात धरणाची जी परिस्थिती आहे, त्याबाबत माहिती दिली. त्याचबरोबर मागे 12 राज्यपाल नियुक्त कॅबिनेटचा ठराव झाला होता. त्याबाबतची पुढची कारवाई होण्याबाबत चर्चा करण्यासाठी आलो होतो. जर याबाबत लवकर घेतला तर योग्य होईल. ती विनंती मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

राज्यपालांचं काय म्हणणं?

अजित पवार म्हणाले की, आमची साधारण एक तासात अनेक विषयांवर चर्चा झाल्या. राज्यपालांनीही अनेक बाबतीत प्रश्न विचारले. त्यानुसार अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यातच राज्यपालांकडून आमदारांच्या नियुक्तीचाही एक विषय होता. राज्यपालांनी आमचं ते म्हणणं ऐकून घेतलं. आमदारांच्या या यादीवर कुठल्याही प्रकारचे आक्षेप वगैरे त्यांनी घेतलेले नाहीत. आम्ही फक्त त्यांना आठवण करुन दिली. कधी मान्यता द्यायची तो जरुर त्यांचा अधिकार आहे. त्यावर ते म्हणाले, की ठिकाय मी तुमचं एकून घेतलंय. मी यावर निर्णय घेईन. ईडीच्या दबावाबद्दलची कसलीही चर्चा त्यांच्याशी झालेली नाही. कोरोना, पाऊस, येणारे कृतीकार्यक्रम याबाबतची माहिती त्यांना देण्यात आली.

पुढे ते म्हणाले की, मला अनिल देशमुख जावई अपहरण प्रकरणी काहीच माहिती नाही. त्यांचं अपहरण झालंय की सीबीआयने ताब्यात घेतलंय यासंदर्भात मला माहिती नाही. मात्र या संस्थांच्या सहकाऱ्याचीच आमची भुमिका आहे. त्यामुळे याबाबतचं स्टेटमेंट मी माहिती घेऊनच देईन.

असे आहेत प्रलंबित आमदार

राष्ट्रवादीकडून...

 • एकनाथ खडसे - समाजसेवा आणि सहकार

 • राजू शेट्टी - सहकार आणि समाजसेवा

 • यशपाल भिंगे - साहित्य

 • आनंद शिंदे - कला

काँग्रेसकडून... 

 • रजनी पाटील - समाजसेवा आणि सहकार

 • सचिन सावंत - समाजसेवा आणि सहकार 

 • मुझफ्फर हुसेन - समाजसेवा 

 • अनिरुद्ध वनकर - कला

शिवसेनेकडून...

 • उर्मिला मातोंडकर - कला

 • नितीन बानगुडे पाटील - शिवव्याख्याते

 • विजय करंजकर - शिवसेना नाशिक जिल्हाध्यक्ष

 • चंद्रकांत रघुवंशी - नंदुरबार, पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आमदार

loading image
go to top