
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत असताना वीजपुरवठा खंडित...
मुंबई : मुंबई येथील मंत्रालयात राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना आज बुधवारी (ता.११) अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे बैठकीत अडथळा निर्माण झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बैठकीला व्हिडिओ काॅन्फ्ररन्सद्वारे उपस्थित होते. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओबीसी आरक्षण (OBC) प्रश्नावर चर्चा सुरु होती. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलत असताना अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगितले जात आहे. (Chief Minister Uddhav Thackeray Speaking While Electricity Gone In Ministry Of Council Meeting)
हेही वाचा: पालघरमध्ये उभारणार नवीन विमानतळ - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबईत बेस्टद्वारे वीजपुरवठा केला जातो आहे. या घटनेची चौकशी होणार का? नेमक्या कोणत्या कारणामुळे वीजपुरवठा खंडित झाला हे स्पष्ट झालेले नाही. मंत्रालय हे सत्तेचे केंद्र आहे. येथे वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था असणे अपेक्षित आहे. मात्र आजच्या घटनेमुळे पर्यायी व्यवस्था नसल्याचे दिसून आले.
हेही वाचा: बाळासाहेबांच्या नावाखाली आणखी किती काळ दिशाभूल ? भाजपची उद्धव ठाकरेंवर टीका
सध्या प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यामुळे राज्यात विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यातच कोळसा टंचाई निर्माण झाल्याने काही भागांमध्ये भारनियमन सुरु आहे.
Web Title: Chief Minister Uddhav Thackeray Speaking While Electricity Gone In Ministry Of Council Meeting
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..