esakal | ब्रेकिंग : विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी पंढरीला तुमचा प्रतिनिधी म्हणून जाणार... : video
sakal

बोलून बातमी शोधा

Chief Minister Uddhav Thackeray will come to Pandharpur on the occasion of Ashadhi to pay obeisance to Vitthal

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी वारीसाठी पंढरपुरात येणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्य, देश कोरोनापासुन मुक्त व्हावे, असं साकडं आपण विठ्ठलाला घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

ब्रेकिंग : विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी पंढरीला तुमचा प्रतिनिधी म्हणून जाणार... : video

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

सोलापर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी वारीसाठी पंढरपुरात येणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्य, देश कोरोनापासुन मुक्त व्हावे, असं साकडं आपण विठ्ठलाला घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 
आषाढी एकादशीची सुमारे ८०० वर्षापासून परंपरा सुरु आहे. २०१० मध्ये मी पांडुरंगाचे दर्शन घेतले. तेव्हा प्रत्यक्ष सहभागी झालो नाही. विठ्ठलाचे विश्‍वरुप मी पाहिले ते वारकऱ्यांच्या रुपात. हेलिकॉप्टरमधून तेव्हा वारीची एरिअल फोटोग्राफी केली होती. त्याचे पुढे ‘पहावा विठ्ठल’ हे पुस्तक आले. वारीतील रिंगण सोहळा हा फक्त आपल्यातच आहे. यावेळी नाईलाज म्हणून वारी रद्द करावी लागली. आपल्या वतीने मी विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी पंढरपूरला जाणार आहे. आता हा चमत्कार दाखवं आणि महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाला कोरोनापासून मुक्त करं, असं साकडे आण विठ्ठलाला घालणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधताना सांगितले आहे. आषाढी एकादशीला मुख्यमंत्री म्हणून नाही तर तुमचा प्रतिनिधी म्हणून जाणार आहे. मुख्यमंत्री म्हणून मिळणारा बहुमान वेगळा पण वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

पंढरपुरात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात विठ्ठलाच्या महापूजेसाठी येऊ नये असे आवाहन केले होते. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा, असे सांगितले होते. विविध ठिकाणाहून याबाबत वेगवेगळी मागणी आल्याने मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेतील याकडे लक्ष लागले होते. मात्र आता, त्यांनी मी येणार असल्याचे सांगितले आहे.