esakal | उद्धव ठाकरे-नारायण राणे एकाच मंचावर |Chipi Airport Inauguration
sakal

बोलून बातमी शोधा

Chipi Airport Inauguration : उद्धव ठाकरे-नारायण राणे एकाच मंचावर

Chipi Airport Inauguration : उद्धव ठाकरे-नारायण राणे एकाच मंचावर

sakal_logo
By
नामदेव कुंभार

Chipi Airport Inauguration : शिवसेना आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील धुसफूस कायम असताना चिपी विमानतळाच्या उद्‍घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर आमनेसामने येण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबरला होणार आहे. केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे हे दोघेही निमंत्रित आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरील नावांची माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद राज्यातील चर्चेत आहे. त्यातच आता हे दोन्ही नेते एकाच व्यासपिठावर येण्याची शक्यता आहे. चिपी विमानतळाच्या लोकार्पण कार्यक्रमाला केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे येणार आहेत. मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहेत. तर राजशिष्टाचारानुसार तिसऱ्या क्रमांकावर स्थानिक नेते व केंद्रीय मंत्री या नात्याने नारायण राणे यांचे नाव निमंत्रितांच्या यादीत सामाविष्ट करण्यात आल्याचं समजतेय.

भाजप-शिवसेनेतील श्रेयवाद आणि चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांना बोलावण्याची गरज नाही या नारायण राणे यांच्या विधानामुळे राजकीय वाद रंगला होता. त्या पाश्र्वभूमीवर नऊ ऑक्टोबरला काय होते याबाबत उत्सुकता आहे. तसेच बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपी विमानतळाच्या तयारीचा आणि कार्यक्रमाचा आढावाही घेतला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला हजर राहणार हे नक्की मानलं जात आहे. तर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे उपस्थित असल्यामुळे केंद्रातील नेते नारायण राणेही उपस्थिती दर्शवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे एकाच मंचावर राणे आणि ठाकरे हे दिग्गज दिसण्याची शक्यता आहे. व्यासपीठावर आता राज्य आणि केंद्राची श्रेयवाद पाहायला मिळतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

loading image
go to top