राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या चित्रा वाघ यांना लॉटरी; मिळाली 'ही' जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये गेलेल्या चित्रा वाघ यांना लॉटरी लागली असून त्यांची महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे चित्रा वाघ यांना भाजपमध्ये गेल्याने लॉटरी लागली असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये गेलेल्या चित्रा वाघ यांना लॉटरी लागली असून त्यांची महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे चित्रा वाघ यांना भाजपमध्ये गेल्याने लॉटरी लागली असल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी मुंबईत प्रवेश करत राष्ट्रवादीला मोठा झटका दिला होता. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकताना लोकांची भूमिका मांडण्याऐवजी आता त्या सोडवून दाखवेन. मी कुठेही पळून गेलेले नाही. मी गद्दार नाही, राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादी पक्ष सोडला असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. पतीच्या चौकशीचा आणि भाजपा प्रवेशाचा काहीही संबंध नसल्याचंही चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलं होतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chitra wagh appointed as Member of the Womens Economic Development Corporation