Christmas 2022 नक्की सॅंटा क्लोज म्हणजे कोण? का देत होते ते लहान मुलांना गिफ्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Christmas 2022

Christmas 2022 : नक्की सॅंटा क्लोज म्हणजे कोण? का देत होते ते लहान मुलांना गिफ्ट

Christmas 2022 : सॅंटा क्लोज कोणाला माहिती नाहीये? आपण सगळ्यांनी सेंटा क्लोजच्या गोष्टी लहानपणपसून ऐकल्या असतीलच, ख्रिसमसच्या रात्री दरवर्षी सॅंटा क्लोज येतो आणि लहान मुलांसाठी गिफ्ट ठेवून जातो अशी आख्यायिका आहे. सगळेच लहान मूल या कल्पनेने खूप खुश होतात.

हेही वाचा: Christmas Fashion : या फॅशनेबल ड्रेसेसने करा क्रिएट आपला ख्रिसमस पार्टी लुक

सॅंटा क्लोज जिजसच्या मृत्यूच्या जवळजवळ 280 वर्षांनंतर जन्माला आले होते. त्यांची जिजसवर खूप श्रद्धा होती आणि आपल्या पालकांच्या मृत्यूनंतर ते मोनेस्ट्री मध्ये राहू लागले. आपल्या वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांना पादरी (चर्चमधले धर्मगुरू) ही उपाधी मिळाली.

हेही वाचा: Pregnency Tips : प्रेग्नेंट आहात? तर मग नक्की खा ही फळ

त्यांच्या स्वभाव खूप दयाळू होता आणि त्यांना लहान मूल खूप आवडायची. असं म्हणतात की, सेंट निकोलस हे ख्रिसमसच्या मध्यरात्री उठून गरीब मुलांना गिफ्ट देयला जायचे. त्यांच्या आवडीचे, त्यांना लागणारे सामान, खेळणी, खाऊच्या गोष्टी ते मुलांना देयचे. त्यांच्या मृत्यू पर्यंत त्यांनी हे दरवर्षी केलं. त्यांच्या मृत्यूनंतर हे काम लोकांनी बंद नाही केलं, लोक त्यांच्या सारखे कपडे घालून असे गिफ्ट्स वाटू लागले.

हेही वाचा: Pregnency Tips : अजब नियम! बाळंतपणात रडण्या-ओरडण्यावर आहे बंदी

अशी सुरू झाली ख्रिसमस ट्रीची परंपरा

ख्रिसमस ट्री सजवण्याची प्रथा जर्मनीमध्ये 8 व्या शताब्दीपासून सुरू झाली. इसाई धर्माच्या प्रचारकांनी याची सुरुवात केली. पुढे 1912 मध्ये अमेरिकेतल्या एक मुलाने आपल्या बाबांकडे हट्ट करत ख्रिसमस ट्री घरी आणून सजवायला लावला आणि इथून या प्रथेला सुरुवात झाली. असं म्हणतात की ख्रिसमस ट्री घरात आणल्याने घरातले वास्तू दोष संपतात आणि घरात पोजिटीव्ह एनर्जी राहते. घरात शांतता आणि आनंदाच वातावरण टिकत.