रोहा : गणेशोत्सवात अंनत चतुर्थी पर्यंत महामार्गावर अवजड वाहनांना बंदीचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले होते. असे असताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला अवजड वाहन चालकांनी केराची टोपली दाखवत मुंबई-गोवा महामार्ग व विले भागाड एमआयडीसी रस्त्यावर खुलेआम अवजड वाहनांची वाहतूक होत आहे.