Exclusive ! 12 जानेवारीपासून सुरु होणार पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा 

तात्या लांडगे
Sunday, 3 January 2021

मुलांच्या भविष्यासाठी घेतले जातील ठोस निर्णय 
कोरोनाच्या संकटातही मुलांची शिक्षणातील गोडी कायम राहावी, शिक्षणाच्या प्रवाहातून मुले- मुले बाहेर जाणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. भाषा विषयातील स्वाध्याय उपक्रमातून, दिक्षा ऍपच्या माध्यमातून, गुगल, गृहभेटी, सह्याद्री, दूरदर्शनसह अन्य ऑनलाईनच्या माध्यमातून मुलांना शिक्षण दिले जात आहे. परंतु, ज्यांच्याकडे काहीच साधने नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी शाळा हाच पर्याय आहे. या पार्श्‍वभूमीवर नववी ते बारावीनंतर आता 12 जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचे नियोजन आहे. 
- वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री 

सोलापूर : राज्यात आता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु झाले असून 22 हजार 204 पैकी बारा हजारांपर्यंत शाळा सुरु झाल्या आहेत. 56 लाख 48 हजार 28 विद्यार्थ्यांपैकी 16 लाखांहून अधिक विद्यार्थी शाळेत हजेरी लावत आहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसही काही दिवसांत येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून 12 जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे.

मुलांच्या भविष्यासाठी घेतले जातील ठोस निर्णय 
कोरोनाच्या संकटातही मुलांची शिक्षणातील गोडी कायम राहावी, शिक्षणाच्या प्रवाहातून मुले- मुले बाहेर जाणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. भाषा विषयातील स्वाध्याय उपक्रमातून, दिक्षा ऍपच्या माध्यमातून, गुगल, गृहभेटी, सह्याद्री, दूरदर्शनसह अन्य ऑनलाईनच्या माध्यमातून मुलांना शिक्षण दिले जात आहे. परंतु, ज्यांच्याकडे काहीच साधने नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी शाळा हाच पर्याय आहे. या पार्श्‍वभूमीवर नववी ते बारावीनंतर आता 12 जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचे नियोजन आहे. 
- वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री 

राज्यातील कोरोनाचा संसर्ग आता हळूहळू कमी होऊ लागला आहे. मात्र, ब्रिटनमध्ये कोरोनाचा दुसरा विषाणू आढळल्यानंतर पुन्हा पालकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर पहिली ते चौथीचे वर्ग थोडे उशिराने सुरु करण्याचे नियोजन आहे. परंतु, पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यात येणार असून तत्पूर्वी, सर्व शिक्षकांची 'आरटीपीसीआर' टेस्ट केली जाणार आहे. शाळांचा परिसर स्वच्छ करुन वर्गखोल्या सॅनिटाइज केल्या जाणार आहेत. मुलांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन काही तासांपुरतीच शाळा भरविण्याचे नियोजन आहे. त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, गावकऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. शाळा सुरु केल्यानंतर मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना त्याठिकाणी केल्या जाणार असून जेणेकरुन पालकांचा विश्‍वास वाढण्यास मदत होईल, यादृष्टीने शालेय शिक्षण विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात राज्यभर आदेश पारित केले जाणार आहेत.

शालेय शिक्षणमंत्री म्हणाल्या... 

  • स्वाध्याय, गृहभेटी अन्‌ ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना लागली शिक्षणाची गोडी 
  • शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक, मुख्याध्यापकांमुळे संकट काळात मुलांना दिले जातेय ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षण 
  • संकट काळात मुलांना घरबसल्या शिक्षण देण्यात महाराष्ट्र देशातच नव्हे तर जगात अव्वल 
  • नववी ते बारावीच्या 13 हजारांहून अधिक शाळा सुरु असून त्यात 16 लाखांपर्यंत विद्यार्थ्यांची उपस्थिती 
  • मुला- मुलींची शाळांमधील गळती कमी करुन उपस्थिती वाढविण्याचा प्रयत्न; राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे उल्लेखनिय योगदान 
  • कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नसून प्रतिबंधात्मक लसही उपलब्ध झालेली नाही; पहिली ते चौथीची शाळा उशिराने सुरु होईल 
  • पाचवी ते आठवीचे वर्ग आता राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून सुरु करण्याचे नियोजन 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Classes V to VIII now planned to start from January 12 on the occasion of Rajmata Jijau Jayanti